Sunday, November 30, 2008

आर.आर.आबा तुम्ही निष्कलंक राहा. निष्क्रिय नको .

आबा नुसतेच व्यथीत होऊ नका ,आतातरी आपला निष्क्रियपणा सोडा.तुम्ही राज्याच्या गृहमंत्रीपदाची आणि शिवराज पाटलांनी देशाच्या गृहमंत्रीपदाची होता होईल तेवढी प्रतीष्ठा आणि जरब कमी करन्याची एकही संधी सोडली नाही.आपण निष्कलंक राजकारणी आहात हे सगळा महाराष्ट्र जाणुन आहे.म्हनुन तर महाराष्ट्राची जनता तुमच्याकडे मोठया आशेने पहात होति.त्यांना तुमच्यात यशवंतराव चव्हानांचा ,शरद पवारांचा वारसदार दिसत होता .म्हणुन त्यांनी तुमच्या सर्व चांगल्या योजना डोक्यावर घेतल्या.संत गाडगेबाबा स्वच्छता आभियान आजही तुमच्याच नावाने गावागावात राबविले जाते. `गोळीला उत्तर गोळीने` या तुमच्या वाक्यावर आक्खा महाराष्ट्र तुमच्यावर फिदा होता. सर्व जनता तुम्हाला आदराने आबा संबोधायला लागली होता.कोनत्याही प्रस्थापीत राजकारन्याला असे जनतेचे प्रेम मिळाले नाही.परंतु तुम्ही तुमच्या निष्क्रियतेने जनु जनतेशी प्रतारणाच केली आहे.तुम्ही निष्पाप आहात ,तसेच रहा ,मात्र निष्क्रिय राहु नका . आज महाराष्ट्राच्या पोलीस दलात बजबजपुरी माजली आहे. वरिष्ठ आधिकरी जनतेचे रक्षण करन्यापेक्षा स्वताची लॉबिंग करन्यात मश्गुल आहेत.त्यामुळेच तर अतिरेकी सुरक्षीतपणे गेट वे ऑफ इंडियापासुन शिवाजी टर्मीनस पर्यंत धडक मारु शकले.कुठे गेले होते तुमचे गुप्तहेर खाते ??? कुठे गेले होते बंदोबस्तावरील पोलीस ?????फक्त मुम्बैचीच ही व्यथा नाही.सगळ्या महाराष्ट्रात हेच वातावरन आहे.मोटरसायकली चोरी,घरफोडी, दरोडे,रस्त्याने चालनार्या भगीनींच्या मंगळ्सुत्राची चोरी,छोटी मोठी टोळी युध्हे ह्या तर सगळ्या शहरात रोज घडनार्या घटना आहेत.पोलिस दलातील वाहतुक पोलीस ही शाखा तर दलाची वसुली शाखा आहे अशीच शंका येते.शहराच्या कोपरा कोपरावर टोळी टोळीने वाहतुक पोलीस वाहनधारकांना लुबाडन्याचे काम करीत असतात. आबा तुम्ही आत्मपरिक्षन करा.तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे रक्षन करु शकत नसाल तर बिनधास्तपने राजीनामा देऊन मोकळे व्हा.तुम्हीही अकार्यक्षम असल्याची बदनामी टाळा आणि गृहमंत्रीपदाची प्रतीष्ठा आणि जरब कमी करु नका.

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...