Friday, June 26, 2009

`अरे थु तुझ्या जिंदगीवर `

दिवाळीच्या काही दिवस आधीची घटना आहे.जगभर मंदीची चाहुल लागली होती.भल्या भल्यांची झोप या मंदीच्या चाहुलीमुळे उडाली होती.मी ही हताशपणे माझ्या अशिलांसमवेत शेअर्स मार्केटचे अवलोकन करत बसलो होतो. माझा व्यवसायच शेअर्स ब्रोकिंगचा असल्यामुळे मला सकाळी ९.५५ ते दुपारी ३.३० पर्यंत कोणताही डिंक न वापरता खुर्चीला चिकटुन बसावे लागते. बरोबर तेवढयाच कालावधीसाठी माझ्या कानाचे आणि माझ्या मोबाईलचे प्रेमसंबंध उत्कट स्थितीला पोहोचलेले असतात.परंतु मंदीचा फटक्यामुळे आता त्यांच्यातही दुरावा निर्माण झालेला होता.म्हनुनच मी त्यादिवशी डोंबारयाच्या ढोलकीचा आवाज ऐकु शकलो.आवाज ऐकताच क्षणी मी खुर्चीतुन उठलो आणि ऑफिसच्या बाहेर आलो.अगदी समोरच डोंबारयाने आपला खेळ चालु केला होता.
एव्हाना आमच्या ईमारतीच्या व्हरांडयात बरयापैकी गर्दी जमली होती.दोघाबाजुने दोन दोन टोकरांनी बांधलेल्या दोरीवर एक चिमुरडी तोल सांभाळत कसरत होती.तीची आई आपल्या आणखी दोन बछडयांना सांभाळत त्या चिमुरडीवर ओरडत होती.माझ्या मुलीपेक्षा वर्षा दोन वर्षानी मोठी असणारी ती चिमुरडी अतिशय निर्विकारपणे त्या उंच बांधलेल्या दोरीवर कसरत करत होती.तिच्या मनात कसलीही भिती दिसत नव्हती.तिचा तो निर्विकार चेहरा पाहुन माझ्या डोळ्यात टपकण पाणी आले.
माझ्याबरोबर अनेक जण तिची कसरत पहात होते.शेजारच्या ऑफिसमध्ये आलेले एक सदगृहस्थ आपल्या कडयावरच्या छकुलीला अतिशय आनंदाने ती कसरत दाखवत होते आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग करत होते.मी डोळ्यातील पाणी पुसत होतो आणि अचानक डोंबार्याची बायको हातात ताट घेऊन पैसे मागायला येताना दिसली. तिला पाहताच आतापर्यंत त्या चिमुरडीच्या कसरतीचा आनंद घेनारे पळायला लागले होते.त्या सर्वांना मी थांबायला लावले आणि प्रत्येकाने १० रुपये देण्याचे भावनीक आवाहन केले.तेथे हजर असलेल्या शिपायापासुन ते मालकापर्यंत सर्वांनी अगदी भरभरुन प्रतिसाद दिला.मात्र आपल्या कडयावरच्या छकुलीला आनंदाने ती कसरत दाखवरया इसमाने( आता मी त्याला सदगृहस्थ म्हननार नाही) माझ्या आवाहनाला भिक घातली नाही.मी त्याला जाणीव करुन दिली कि साहेब तुम्ही त्या पोरिची कसरत दाखवत होतात तेव्हा तुमच्या मुलीच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहात होता.आणि त्याचेही पैसे देत नसाल तर तुम्ही जी शुटींग केली त्याचे तरी द्या.तेव्हा कुठे त्या इसमाने सुट्टे नाहीत १० रुपये देतो नंतर असे सांगुन शेजारच्या ऑफीसात एंट्री मारली .डोंबार्याचा खेळ संपत आला होता.साहेब १० रुपये देनार नाहीत यावर व्हरांडयातल्या सर्वांचे एकमत झाले होते.मी १० रुपये सोडनार नाही असे सगळ्यांना सांगितले होते.मीही माझ्या स्वभावाप्रमाणे ईरेला पेटलो होतो.तो इसम शेजारच्या ऑफीसमधुन बाहेर पडल्या पडल्या मी पुन्हा माझा घोशा सुरु केला.मी सुट्टे आणुन देतो थोडयावेळात असे म्हनत तो इसम भरकन निघुन रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या दहा बारा लाखाच्या आलिशान गाडीत जाऊन बसला .आम्ही सारेजन त्याच्याकडे पहात होतो.त्यानेही आमच्याकडे पाहीले आनि गाडी चालु केली .त्याक्षणी माझ्या तोंडतुन जोरदारपणे आवाज निघाला.....`अरे थु तुझ्या जिंदगीवर `

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...