Posts

शाब्दिक दणका

गोड बोलून जर एखाद्याला सांगितलेले समजत नसेल तर शाब्दिक का होईना पण दणका द्यावाच लागतो .म्हणतात ना `उंगली तेढी करनी पडती है `.हल्ली आर्चीच्या भाषेत विचारतात ,`इंग्लिश मध्ये सांगू का ?`.असाच दणका मागच्या आठवड्यात एका पालकाला दिला .
           झाले असे ,मागच्या आठवड्यात माझ्या माध्यमातून एक लग्न जमले.वधु पक्ष व वर पक्षाकडचे असे दोघेही माझे जुने संबंधित होते.म्हणून लग्न जुळविण्यास फार अडचण आली नाही.मुलगा मुलगी दोघेही उच्चशिक्षित .एकमेकाला अनुरूप आणि एकमेकांची पसंती .लग्न कसे करायचे ,कुठे करायचे यावर दोघा पक्षाकडून परस्पर एकमत झाले.पण दुपारी  की गोरज मुहूर्तावर करायचे याबाबत तिढा निर्माण झाला .प्रकरण माझ्याकडे आले.मुलीचे वडील ग्रामीण भागात राहणारे आणि मुलाचे नाशिकमध्ये.तरी नाशिकमध्ये दुपारी लग्न काढून द्यायला वधूपिता राजी .पण वरपित्याचा  हट्ट गोरज मुहूर्ताचा .शे सव्वाशे किलोमीटर वरून वऱ्हाड येणार ,रात्री उशिरा परत जाणार .अनेक वऱ्हाडी मंडळी शेतात राहणारे .त्यांची अडचण होईल .गोरज मुहूर्ताच्या लग्नाचा खर्चही वाढणार होता.म्हणून वधूपिता गयावया करीत होता. मी वरपित्याला या सर्व अडचणी समजावून स…

मोफत तिथे आफत

जिओ च्या फुकट सेवेमुळे अंबानीला फायदा झाला कि नाही माहित नाही .परंतु सर्वाधिक नुकसान जर कोणाचे होत असेल तर ते कॉल रिसिव्ह करणाऱ्याचे.फुकट असल्यामुळे बोलणाऱ्याला काही तोटा होत नाही पण ऐकणाऱ्याला त्याचे हातातले काम बाजूला ठेवावे लागते.`बरं,ठेऊ का आता` असे म्हटले तरी बोलणारा `ऐकून तर घ्या `असे म्हणून गुऱ्हाळ चालू ठेवतो .`जिओ ने दिले मोफत पण आमच्यावर ओढवली आफत ` असे म्हणायची वेळ आली .

बाक्कोळा

बाक्कोळा .....खानदेशातल्या ग्रामीण भागात बोलला जाणारा हा शब्द काळाच्या ओघात बरेच जण विसरले असतील .परवा होळीच्या दिवशी मला हा शब्द मला अचानक आठवला आणि बालपणाच्या आठवणी ताज्या झाल्या .खेड्यापाड्यात होळीच्या पूजनासाठी शेणाच्या खास गोवऱ्या बनवल्या जायच्या .त्यातल्या बर्फीच्या आकाराच्या गोवर्यांना `बाक्कोळे` म्हणायचे.अशा गवर्यांची माळ बनवून होळीच्या पूजनासाठी वापरायचे. होळी संपली की या शब्दाचा महिला वर्गाकडून शिवी म्हणून वापर व्हायचा .गल्लीत चिल्ले पिल्ले खेळताना त्रास व्हायला लागला की एखादी बाई हमखास शिवी द्यायची ,`ये बाक्कोळास्वन ,तुमनी व्हळी व्हयी जाओ तुमनी ,काय गर्दी लायी दिधी रे आठे .` आणि मग मुलांची पांगापांग व्हायची .
अहिराणीतले असे अनेक खास शब्द आहेत ज्यांच्याशी बालपणीच्या आठवणी निगडित आहेत.तुमच्याही आठवणीतले काही शब्द असतील तर जरूर कळवा.

ब्रेकिंग न्यूज- नाशिक मध्ये गंजलेल्या रेल्वे डब्ब्यांची राजरोस चोरी .

(आमच्या वार्ताहराकडून ) नाशिक - नाशिक मध्ये गेल्या साडेचार वर्षांपासून एकाच जागेवर उभ्या असलेल्या रेल्वे इंजिनाच्या डब्ब्यांची राजरोसपणे चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.सदर रेल्वे एकाच ठिकाणी ऊन ,वारा व पैशात ...सॉरी पावसात उभी असल्यामुळे गंजून गेली असून आतापर्यंत तिच्या ४० पैकी २१ डब्ब्यांची चोरी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.आमच्या वार्ताहराने अधिक चौकशी केली असता अजून चार डब्बे खिळखिळ्या अवस्थेत असून त्यांना खरेदी करण्यासाठी काही भंगार व्यापाऱ्यांनी सेटिंग लावून ठेवल्याचे कळले.खरेदीदारांशी संपर्क साधला असता त्यांनी हि सौदेबाजी खरी असल्याची कबुली दिली .जुन्या भंगार डब्ब्यांना रंगरंगोटी करून येणाऱ्या जत्रेत बाळगोपाळांच्या करमणुकीसाठी यांचा वापर करणार असल्याचे त्यांनी आमच्या वार्ताहरास सांगितले.
आमच्या वार्ताहराने सदर रेल्वेबद्दल अधिक तपशील गोळा केला असता अतिशय रंजक माहिती समोर आली आहे.एक तरुण तडफदार चालक नवे कोरे इंजिन घेऊन नाशिकला आला तेव्हा सर्व नाशिककरांनी त्यांचे मनापासून स्वागत केले होते.या इंजिनाला तुम्ही डबे जोडा मी तुम्हाला स्वर्गाची सफर घडेल असे नाशिक घडवून …

अधिकाऱ्यांचे बूट सोन्याचे असतात का हो ?

सरकारी अधिकाऱ्यांचे बूट सोन्याचे असतात का हो ? नाही ना ? मग एक किस्सा सांगतो . मागच्या आठवड्यात एका सरकारी कार्यालयात कामानिमित्त गेलो होतो .काम तसे किरकोळ आणि नियमांच्या चौकटीत बसणारे होते .पण शेवटी ते सरकारी काम होते आणि त्याची शेंडी एका जबाबदार अधिकाऱ्याकडे होती .त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात गेलो तर दरवाज्यातच चपला बुटांचा खच पडलेला होता .एक चप्पल कुठे तर दुसरी कुठे अशी अस्ताव्यस्त परिस्थिती होती .दरवाज्याच्या बाहेर कागदाचा बोर्ड लावलेला होता ,`पादत्राणे बाहेर काढावीत `!!. मी बोर्ड वाचला आणि पायाजवळील पसारा पाहिला.आपण जर येथे बूट काढले तर परत शोधायला अर्धा तास लागेल असे मनोमन वाटले.बूट काढावेत की नाही याचा विचार करीत असताना सहज म्हणून कार्यालयात डोकावले तर टेबलाखालून साहेबांचे बूट वाकुल्या दाखवत होते. साहेबांच्या आजूबाजूला बसलेल्या सहकाऱ्यांच्या टेबलाखाली नजर मारली तर सर्वांचे बूट चप्पल वाकुल्या दाखवत होते.म्हणून मी मोठ्या हिमतीने बुटांसहित कार्यालयात प्रवेश केला .कार्यालयात इतर टेबलांवर गर्दी होती .बरीच जनता आपला नंबर केव्हा येतो याची वाट पाहत बाकड्यांवर बसलेले होते.अर्थात सगळ्य…

मास्तरची बायको मास्तरीण , पगार ची बायको पगारीन

लोकांचं काही खरं नाही राव ,काय बोलतील आणि कसे बोलतील काही भरवसा नाही.काल चौकातून घराकडे पायी पायी येत होतो आणि अचानक एक मोटारसायकल जवळ येऊन थांबली .एक जुना मित्र भेटला ,त्याला मी `तमासगिर `च म्हणतो .बोलताना नेहमी वेडेवाकडे हावभाव करून फाटलेल्या तोंडाने बोलत असतो.काल बोलता बोलता म्हटला ,अरे चल निघतो जरा घाई आहे.
विचारलं ,अरे काय घाई एवढी.तर तो .........अरे त्या मुक्याचे पैसे द्यायचे आहेत . कोण मुक्या रे ? अरे ते धिऱ्याच पोरग . थोडीसी टयूब लुकलुकली .मग समजलं ,अरे हा मुकेश अंबानी च्या कुठल्यातरी सेवेचं बिल भरायला चालला होता . अशीच एक गम्मत सांगतो . ग्रामीण भागात डॉक्टर च्या बायकोला डॉक्टरीण म्हटले जाते.मास्तरच्या बायकोला मास्तरीण म्हटले जाते.अगदी नेहमीचे आहे हे.पण एकेदिवशी ओळखीच्या एक बाई भेटल्या .बोलता बोलता माझ्या सौ.ची त्यांनी चौकशी केली .`पगारीन` बाईंचे काय चालले ? मला क्षणभर चक्रावल्यासारखे झाले.मग लक्षात आले .पगार ची बायको पगारीन !!!

आरक्षणाचे अपयश की आमचे दुर्दैव ?

आरक्षणाचा फायदा घेऊन आर्थिक स्तर उंचावण्याबरोबरच वैचारिक पातळीही उंचावली पाहिजे अशा आशयाची प्रतिक्रिया मी मागच्याच आठवड्यात माझ्या एका फेसबुक पोस्टवर दिली होती .दुर्दैव म्हणा किंवा आरक्षणाच्या उद्देशाचे अपयश म्हणा अजूनही अनेकांची वैचारिक पातळी जशी आहे तशीच आहे. असे मत व्यक्त करायला आणि त्याचा अनुभव लगेच घ्यायची वेळ मला मागच्या आठवड्यात आली .त्याचे असे झाले, शनिवारी मी पुण्याला जाण्यासाठी ठक्कर बाजार बस स्टॅण्डवर एका बस मध्ये चढलो. बसमध्ये गेलो आणि आवाज आला ,`ओ हेमंतराव ,या मागे .`बसमध्ये मागच्या बाकावर बसलेल्या एका ओळखीच्या प्राध्यापकाने आवाज दिला होता.आरक्षणाचा फायदा घेऊन नाशिकमधल्या एका नामांकित संस्थेत हे प्राध्यापक नोकरीस होते.मी एम.एस्सी .ला असताना सर सटाणा येथे नोकरीस होते .त्यामुळे त्यांची आणि माझी चांगली ओळख होती .मी सरांना म्हटले ,इतक्या मागे बसण्यापेक्षा पुढेच या .पण त्यांच्या आग्रहामुळे मला मागे जावे लागले.पुण्याला जाताना अनेकदा जिल्ह्यातील बरेच प्राध्यापक सोबत असतात .विद्यापीठातील कामासाठी ते जात असतात .म्हणून सरांना विचारले ,`काय विद्यापीठात चालले वाटत ?`…