मित्रांनो ,फेसबुक चाळतांना कुणीतरी अज्ञाताना लिहिलेले हे शेतकऱ्याच मनोगत वाचण्यात आलं .मी सुद्धा शेतकरी असल्यामुळे मला कुठेतरी ते भावलं .हे मनोगत फक्त फेसबुकच्या कट्ट्या पुरताच मर्यादित न राहता ते सगळ्यांपर्यंत पोहोचाव या उद्देशान खाली जसेच्या तसे देत आहे.त्या आधी शेतकऱ्याच मनोगत अतिशय समर्पक शब्दात मांडणार्या `त्या `अज्ञात लेखकाचे आभार मानणे योग्य होईल .
होय आमच्या मुलांनाही मल्टीप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहावेसे
Friday, August 30, 2013
शेतकऱ्याच मनोगत
मित्रांनो ,फेसबुक चाळतांना कुणीतरी अज्ञाताना लिहिलेले हे शेतकऱ्याच मनोगत वाचण्यात आलं .मी सुद्धा शेतकरी असल्यामुळे मला कुठेतरी ते भावलं .हे मनोगत फक्त फेसबुकच्या कट्ट्या पुरताच मर्यादित न राहता ते सगळ्यांपर्यंत पोहोचाव या उद्देशान खाली जसेच्या तसे देत आहे.त्या आधी शेतकऱ्याच मनोगत अतिशय समर्पक शब्दात मांडणार्या `त्या `अज्ञात लेखकाचे आभार मानणे योग्य होईल .
Thursday, August 22, 2013
हत्या ,खून , हौतात्म्य की बलिदान ,पण मृत्यू तो मृत्यूच !!!
अनिंसचे नरेंद्र दाभोलकर यांचा पुण्यात भरदिवसा खून झाला. दुसर्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी हि बातमी मुख्य पानावर ठळकपणे दिली .त्याचदिवशी कालनिर्णयचे संस्थापक जयंत साळगावकर यांचेही निधन झाले .ती बातमीही दाभोलकरांच्या बातमी शेजारीच होती.वास्तविक दोघा घटनेत एक गोष्ट निश्चित होती ती म्हणजे दोघांचा जीव गेला होता .मात्र बातमी देताना एका घटनेत हत्या झाली ,खून झाला अशी वाक्यरचना तर दुसर्या घटनेत निवर्तले ,कालवश झाले,निधन झाले अशी वाक्यरचना होती.म्हणजेच जीव गेला ,मृत्यू झाला हीच घटना किती विविध प्रकारे वृत्तपत्रातून दिली जाते याचे हे उत्तम उदाहरण एकाच दिवशी एकाच पानावर पाहायला मिळाले .अर्थात हे सगळ मृत्यू कशामुळे झाला याच्यावर अवलंबून असते.
खर तर मृत्यू हा प्रत्येक सजीवाला अटळ आहे.आयुष्यातले सगळ्यात मोठे नुकसान जर कोणते असेल तर ते मृत्यू हे होय .मृत्यूची बातमी देताना मृत्यू कशामुळे झाला यानुसार शब्दरचना बदलत जाते.सीमेवर युद्ध करताना मृत्यू झाल्यास `हुतात्मा झाला `अशी बातमी दिली जाते.याशिवाय `कामास आले`,वीरमरण आले अशीही बातमी दिली जाते .शत्रूचा मृत्यू झाला तर `त्याच्या नरडीचा घोट घेतला ,त्याला यमसदनी पाठवले ,त्यांची मुंडकी उडवली असेही म्हटले जाते.सध्या गुजरातमधील पोलिसांचे प्रकरणही गाजत आहे .पोलिस चकमकीत मृत्यू झाला म्हणून त्याचा `एनकौंटर` केला ,त्याचा गेम केला अशा बातम्या यायच्या.मुंबई पोलिसांच्या चकमकीच्या बातम्या तर मोठ्या रंजक राहायच्या .अमुक टोळीच्या गुंडांचा पोलिसांनी खात्मा केला ,त्याला कंठस्नान घातले , त्याचा मुडदा पाडला ,त्याला नरकात पाठविले अशा चटपटीत बातम्या छापून यायच्या. पण आता ते `एनकौंटर` फेम पोलिसच आरोपीच्या पिंजर्यात अडकल्यामुळे गुंडांना फक्त `कोपरापासून ढोपरापर्यंत `सोलण्याचेच काम चालू आहे .
वृद्धापकाळाने,आजारपणात निधन झाले तर कालवश झाले ,निवर्तले ,निधन झाले ,यांना देवाज्ञा झाली ,वैकुंठवाशी झाले ,प्राणोत्क्रमण झाले ,काळाच्या पडद्याआड गेले,देहावसान झाले ,देहत्याग केला ,महानिर्वाण झाले ,प्राणज्योत मालवली स्वर्गात गेले अशा विविध प्रकारे बातमी दिली जाते.
एखाद्या दुर्घटनेत जीव गेला तर ठार झाले ,बळी गेले असे संबोधले जाते .दुसर्याच्या हातून मरण आले तर खून झाला व स्वत:च जीव घेतला तर आत्महत्या केली असे म्हटले जाते.न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून एखाद्याला जगणे नाकारले जाते तेव्हा त्याला मृत्यूदंड दिला जातो ,त्याला फाशी दिले असे म्हटले जाते.सरकारी यंत्रणेने त्याचा खून केला असे कधी म्हटले जात नाही. एकाद्या हत्येला वध केला असेही संबोधले जाते.
सर्व घटनांमध्ये कोणत्या ना कोणत्या व्यक्तीचा जीव गेलेला असतो.पण स्थळ काळ वेळ परत्वे त्याच्या जीव जाण्याच्या बातमीचे शब्द बदलत राहतात .
Friday, July 26, 2013
गयबान्याच्या लग्नाचा आहेर
आयका मंडळी ,नवरदेवनी मायकडतीन ..........
ओ ओ महाराज ,नवरदेवनी मायन नाव घ्या ,पाव्हणी मंडळीले कळाले पाहिजे ........
बर बर .......
आयका मंडळी ,नवरदेवनी माय सोन्याबाई इटलीकर यास्नाकडतीन तुमले सगळास्ले महागाई ,भ्रष्ट्राचार ,बेरोजगारीना आहेर शे .......
ओ ओ महाराज , शाटकट नका मारू हो ,सगळा बारीक सारीक आहेर कळू द्या मंडळीले ......
मंडळी ,सगळी यादी वाची दाखाडी ते मना मांगे शी बी आय चौकशी लागी जाई .......बर वाची दाखाडस......तर सोन्याबाई कडतीन महागाई ,बेरोजगारी बरोबर पेट्रोल दरवाढ ,२ जी घोटाळा ,कोळसा घोटाळा ..........बा बा बा बा ...घोटालास्नी मोठी यादी शे हो .........माले नाही परवडणार वाचले ..............
ओ महाराज ,काही वाचू नका पुढली यादी ........मनी पोरना माले आत्ते फोन वनथा ........म्हणे , येळ वनी ते त्या गुजरात ना ब्रम्हचारी संगे लगन करसु पण त्या गयबान्या संगे मनभी वाटोळ व्हऊ देणार नही आणि देशनभी !!!
ओ ओ महाराज ,नवरदेवनी मायन नाव घ्या ,पाव्हणी मंडळीले कळाले पाहिजे ........
बर बर .......
आयका मंडळी ,नवरदेवनी माय सोन्याबाई इटलीकर यास्नाकडतीन तुमले सगळास्ले महागाई ,भ्रष्ट्राचार ,बेरोजगारीना आहेर शे .......
ओ ओ महाराज , शाटकट नका मारू हो ,सगळा बारीक सारीक आहेर कळू द्या मंडळीले ......
मंडळी ,सगळी यादी वाची दाखाडी ते मना मांगे शी बी आय चौकशी लागी जाई .......बर वाची दाखाडस......तर सोन्याबाई कडतीन महागाई ,बेरोजगारी बरोबर पेट्रोल दरवाढ ,२ जी घोटाळा ,कोळसा घोटाळा ..........बा बा बा बा ...घोटालास्नी मोठी यादी शे हो .........माले नाही परवडणार वाचले ..............
ओ महाराज ,काही वाचू नका पुढली यादी ........मनी पोरना माले आत्ते फोन वनथा ........म्हणे , येळ वनी ते त्या गुजरात ना ब्रम्हचारी संगे लगन करसु पण त्या गयबान्या संगे मनभी वाटोळ व्हऊ देणार नही आणि देशनभी !!!
Sunday, June 2, 2013
पार्टी जरा मालदार हवी !!!
कोणता माणूस कधी भेटेल आणि आपलं टाळकं सटकवेल याचा नेम नाही .मला तर अनेक लोक भेटत असतात .पण प्रत्येकाशी वागताना बोलताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ हाच माझा पवित्रा असतो.पण कधी कधी इच्छा नसताना तोंडातली साखर कडू करावी लागते.
काल असेच झाले.सकाळी झोपेत असतानाच मोबाईल खणखणला.अगदी सकाळी फोन आल्यामुळे मी घाबरलो होतो .नंबर अनोळखी होता .तसाच उचलल्यावर पलीकडून चौकशी सुरु झाली .`झोप झाली का हेमंत दादा ? अरे मी पाटील काका बोलतो .`असे सांगून फोन करणार्याने त्याची अजून माहिती दिली .फार फार लांबच्या नात्यातली ओळख पटली .उभ्या आयुष्यात त्यांना कधी भेटलो नाही ,पाहीले नाही .मी ओळख पटल्याचा होकार दिला तशी त्यांनी अजून माहिती द्यायला सुरुवात केली.`अरे आपल्या दादू चे यंदा लग्न करायचे आहे ,एखादी मुलगी पाहून टाक ना !` मी थोडी चौकशी केली तर दादू एम.फार्म.करून परराज्यात चांगल्या पगारावर नोकरी करत होता.मग मी त्यांना त्यांच्या अपेक्षा विचारल्या .`हे पहा हेमंत दादा ,आपल्याला मुलीला काही नोकरीला लावायचे नाही.मुलगी बी.ए.,बी .कॉम. असली तरी चालेल.दिसायला सर्वसाधारण असली तरी चालेल .पण पार्टी जरा मालदार हवी ह !`पार्टी मालदार हवी म्हणजे नक्की काय व कशासाठी ?म्हणून मी पुन्हा चौकशी केली .त्यावर पाटील काका म्हटले,`अरे बाबा ,जरा मालदार पार्टी असली म्हणजे बर ,आपल्या दादूची हौस मौज होईल ,शिवाय पैशाटक्क्याची अडचण भासणार नाही.तू सांग तुटपुंज्या लोकांशी सोयरिक करण्यात काही मजा आहे का ? `.मी म्हटले `बर बर ,शोधू एखादी मालदार पार्टी दादुसाठी.`मग विचार आला हुंड्याची अपेक्षाही एकदा विचारून घ्यावी .`काही नाही दादा ,आपल्या फार अपेक्षा नाहीत .शेजारच्या सरांचा मुलगा डिप्लोमाच आहे .त्याला १२ लाख हुंडा मिळाला .आपला दादू एम.फार्म.आहे ,त्याला २५ लाख तरी मिळायला हवेत.आता माझ टाळकं सटकल होत .अंगावरची गोधडी बाजूला फेकली आणि खाडकन उठून बसलो .लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून हुंडाबिंडा काही नको फक्त चांगली मुलगी हवी असे म्हणणाऱ्या जमान्यात २५ लाखाची अपेक्षा ठेवणाऱ्या महाभागाला त्याची जागा दाखवायलाच हवी असा विचार मनात आला.खाडकन उठून बसल्यामुळे बायकोही किचन मधून धावत आली आणि इशाऱ्यानेच काय झाले ?कोणाचा फोन आहे अशी विचारत होती .मी हि इशाऱ्यानेच तिला शेजारी बसायला लावले व फोनचा स्पीकर चालू केला .मी बोलता बोलता काकांची कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती जाणून घेतली.स्वत : सेवानिवृत्त शिक्षक .घसघशीत पेन्शन चालू.बायकोही शिक्षिका .सहाव्या वेतन आयोगाचा पगार चालू.दादुला भलेमोठे प्याकेज .एकंदरीत महिन्याला लाखाच्या पुढे उत्पन्न .तरीही हाव २५ लाखाची आणि पार्टी मालदार हवी !!
मी डोळे चोळतच काकांना सांगितले ,`काका ,एक पार्टी आहे आपल्याकडे .मुलीच्या बापाचे दोन चार कारखाने आहेत नाशिकमध्ये .२५ काय मी ४० लाख द्यायला सांगतो त्याला .`
काकांच्या तोंडाला लगेच पाणी सुटले.`अरे वा छानच म्हणायचे मग.आपल्याला अगदी अशीच पार्टी पाहिजे .हे आता सगळ तुझ्याच हातात आहे रे बाबा .तुझी मावशी तुझ फार नाव काढत होती .मला रोज सांगायची ,हेमंत दादाला फोन लावा फोन लावा .`मावशी काळी का गोरी आयुष्यात कधी पाहिली नाही .काकांच्या अपेक्षांना पालवी फुटायला लागली होती.
`सगळ्या गोष्टी मिळतील काका .दादूची चांगली हौस मौज होईल .पण तुम्हाला रोज एक काम करावे लागेल .`
`सांग ना दादा ,एक काय दहा काम करायला तयार आहे मी .`
माझ्या झोपेची पुरती वाट लागली होती पण सटकलेल टाळकं थोड जागेवर आल होत.बायकोला माझ्या स्वभावाची कल्पना असल्यामुळे पुढे काहीतरी बॉम्बगोळा पडणार हे तिला कळून चुकले होते. ती इशाऱ्यानेच सांगत होती `जाऊ द्या हो ,कशाला सकाळी सकाळी डोक लावता `
मी मात्र ठाम होतो .समाजातल्या अशा अपप्रवृत्तींना लगाम घालायलाच पाहिजे अशी माझी वृत्ती .त्यांना वठणीवर आणणे हाच माझा उद्देश .
मी पाटील काकांना म्हटले `काही नाही काका .तुम्ही फक्त रोज एकच काम करायचे .मुलीला रोज संध्याकाळी दारू प्यायला लागते तेवढी आणून द्यायची.`
खाडकन फोन आदळायचा आवाज आला आणि मी सैरभैर होऊन माझी गोधडी शोधू लागलो.
बायकोने केव्हाच तिची घडी करून ठेवून दिली होती .
Friday, May 31, 2013
बडबडी मावशी
बडबडी मावशी
आमच्या ओळखीच्या एक बाई आहेत.त्या येताना दिसल्या की रस्ता बदलून घ्यावा लागतो .भेटल्या म्हणजे त्यांची अखंड बडबड ऐकावी लागते.माझ्या बायकोने तर त्यांचे नाव बडबडी मावशी असेच ठेवले आहे.त्यांची बडबड ऐकताना आपल्याला `राहुल द्रविड `च्या भूमिकेत जावे लागते.कुठल्याही परिस्थितीत विकेट पडू देता कामा नये.केव्हा बाऊनसर टाकतील याचा नेम नाही.त्यांना पडलेले काही प्रश्न आणि त्यांचे अनुभव मी तुम्हाला सांगत आहे ते वाचा . त्यांच्या ओळखीतल्या एक नववधू हनिमूनला जाणार होते.सात आठ दिवसाचा त्यांचा दौरा होता .बडबडी मावशीला वाटले ,इतके दिवस चालले म्हणजे हनिमून नावाचे गाव फार लांब असेल.म्हणून त्यांनी माझ्याकडे चौकशी केली .हनिमून मुंबईपेक्षा लांब आहे का ?हनिमूनला जायला इतके दिवस लागतात का ?तिथे काय काय आहे पाहण्यासारखे ? आम्ही उत्तर देण्याची जबाबदारी आमच्या शेजारच्या बाईवर सोडली आणि स्वत:ची सुटका करून घेतली.
त्यांचे काही प्रश्न व त्यांनी दिलेली माहिती पहा.
(१) महिना संपायच्या वेळेसच मंथ एंड का सुरु होतो ?
(२) मॉर्निंग वाल्क सकाळीच का करतात ?
(३)आमच्या नातातल्या मुलीने लव्ह म्यारेज केले आणि आता लग्न करणार आहे .
(४)तुझ्या काकांचे पैसे संपले की आमचा मनी प्रॉब्लेम सुरु होतो .
(५)एकदा माझी तब्बेत बिघडली तेव्हा माझा बी.पी. एकदम कमी झाला आणि ब्लड प्रेशर अचानक वाढला होता.
(६)मी रांगोळी काढताना वेगवेगळ्या रंगाचे कलर वापरते.
(७)थियेटर चा मालक आमच्या ओळखीचा होता म्हणून स्वस्ताचे तिकीट द्यायचा पण पहिल्याच रांगेत बसवायचा .
त्यांचे काही प्रश्न व त्यांनी दिलेली माहिती पहा.
(१) महिना संपायच्या वेळेसच मंथ एंड का सुरु होतो ?
(२) मॉर्निंग वाल्क सकाळीच का करतात ?
(३)आमच्या नातातल्या मुलीने लव्ह म्यारेज केले आणि आता लग्न करणार आहे .
(४)तुझ्या काकांचे पैसे संपले की आमचा मनी प्रॉब्लेम सुरु होतो .
(५)एकदा माझी तब्बेत बिघडली तेव्हा माझा बी.पी. एकदम कमी झाला आणि ब्लड प्रेशर अचानक वाढला होता.
(६)मी रांगोळी काढताना वेगवेगळ्या रंगाचे कलर वापरते.
(७)थियेटर चा मालक आमच्या ओळखीचा होता म्हणून स्वस्ताचे तिकीट द्यायचा पण पहिल्याच रांगेत बसवायचा .
Friday, April 5, 2013
ज्याच्या खिशाला भोक त्याचे काम चोख !!!
काल एका वृत्तपत्रामध्ये ज्यांनी भ्रष्ट्राचारांविरुद्ध कारवाई करायची असते त्या लाचलुचपत खात्यातीलच भ्रष्ट्राचारांविरुद्ध व्यंगचित्र छापुन आले होते .ते पाहिल्यावर मला माझा अनुभव आठवला.माझ्या भाऊबंदकीतल्या एका शेतकरी आपल्या सातबारा नोंदी लावन्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारत होता.तलाठी नोंदी लावण्यास तयार होता मात्र त्यासाठी पैसे मागत होता .शेतकरी जेव्हा कार्यालयात जात तेव्हा तलाठी आपल्या खास शैलीत एक संवाद म्हनायचा ,` ज्याच्या खिशाला भोक त्याचे काम चोख !!!.या प्रकाराला वैतागुन शेवटीने माझ्या भाउबंदाने सगळा प्रकार मला सांगितला व मी मध्यस्थी करावी अशी विनंती केली.तलाठी लांबच्या नात्यागोत्यातला होता म्हनुन काम होऊन जाईल अशी मला आशा होती म्हनुन मी विनंती मान्य केली व तलाठ्याकडे गेलो .माझ्यापुढेही तेच तुनतुने वाजविले ,ज्याच्या खिशाला भोक त्याचे काम चोख .शेवटी आम्ही लाचलुचपत प्रतीबंधक खात्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेलो.तेथे आम्हाला सर्व कार्यपध्द्ती समजावुन सांगण्यात आली व तलाठ्याच्या भेटीची तारिख ,स्थळ ,वेळ ठरवुन पुन्हा येण्यास सांगण्यात आले.सदर शेतकरी त्या दिवशी माझ्याकडेच नाशिकला मुक्कामला होता आणि अशी तक्रार करायची आहे हे त्याला आणि मलाच माहिती होते.तशी गुप्तता आम्ही पाळली होती.दुसर्या दिवशी जेव्हा शेतकरी नाशिक हुन गावाला घरी गेला तेव्हा तलाठी त्याच्या आधी दप्तर घेऊन हजर होता.तेव्हा मात्र तो नात्यागोत्याचा संदर्भ देत होता आणि पाहिजे ती कागदपत्रे द्यायला तयार झाला होता.मलाही खुप आश्चर्य वाटले .असे एकाएक खिशाचे भोक कसे शिवले गेले ?? काही दिवसांनी त्याला खुप विश्वासात घेतले तेव्हा कळले की लाचलुचपत प्रतीबंधक खात्यानेच तलाठ्याच्या खिशाला भोक पाडले होते !!!!!
Wednesday, May 2, 2012
माझे म्हणने पटतेय का बघा !!!
माझे
म्हणने पटतेय
का बघा
!!!
मित्रांनो,हा फोटो
आहे भारतातील
आघाडीचे उद्योगपती
अजय पिरामल
यांचा.त्यांच्या
सोबत आहेत
त्यांच्या पत्नी स्वाती पिरामल.वृत्तपत्र
वाचताना सहज
या फोटोकडे
लक्ष गेले
आणि दोघांच्या
उंचीतील फरक
लगेच डोळ्यात
भरला.अजय
पिरामल साहेब
जवळपास सहा
फुट तर
स्वाती पिरामल
यांची अंदाजे
पाच फुट.मनात विचार
केला,लग्न
करताना यांनी
उंचीचा विचार
केला नसेल
का ??
मित्रांनो,यांनीसुद्धा
उंचीचा विचार
निश्चितच केला
असेल.पण
शारिरीक नाही
तर त्यांनी
एकमेकांच्या कर्तुत्वाच्या उंचीचा विचार केला
असेल.असे
फक्त असाधारण
लोकच करु
शकतात,तुम्ही
आम्ही नव्हे
!!! कारण स्वाती
पिरामल नुसत्या
अजय पिरामल
यांच्या पत्नी
नाहीत तर
त्यासुद्धा कंपनीच्या संचालक आहेत.म्हणजे
अजयरावांच्या खांद्याला खांदा लावुन त्या
कंपनीच्या प्रगतीत सहभागी आहेत.
असेच उदाहरण
मी अमिताभ
बच्चन आणि
जया बच्चन
यांचे देऊ
शकतो.सचिन
तेंडुलकर आणि
त्यांच्या पत्नीचे तर आगळेवेगळे उदाहरण
आहे.सचिन
अल्पशिक्षित तर अंजली डॉक्टर.शिवाय
दोघांच्या वयात ,उंची यात ही
फरक. अंजली
सचिनपेक्षा चार वर्षानी मोठी !!!
मग मी
विचार करतो
,आपणच का
लग्न करताना
उंची,रंग,
वय याचा
नको तेवढा
किस काढतो
??आपण का
कर्तुत्वाला किंमत देत नाही. या
क्षुल्लक गोष्टींचा
किस काढता
काढता लग्नाचे
वय निघुन
जाते आणि
नंतर पश्चातापाशिवाय
हातात काहीच
राहात नाही
.
मित्रांनो आणि मैत्रींणींनो,अजुनही वेळ
गेली नसेल
तर विचार
करा.माझे
म्हणने पटतेय
का बघा
!!!
Subscribe to:
Posts (Atom)
कथा न झालेल्या जुलाबाची
नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...
-
(लेख मोठा असला तरी शेवट मात्र जरूर वाचा ) लग्नांचा हंगाम सुरु झाला असून वधूवरांच्या पालकांची धावपळ नको व एकाच ठिकाणी त्यांना अनेक स्थळे प...
-
नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...
-
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मराठा शुभ लग्न व्हाट्सअप बुलेटिन* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* *जय शिवराय* 🙏🚩 *------------------------------* ...
