Wednesday, December 10, 2008

कामातुरा न भय न लज्जा

राजकारणी लोक सत्तेसाठी कोणत्या पातळीवर जातील,याचे उदाहरण आपण महाराष्ट्राचे माजी महसुल मन्त्री ( बाळासाहेब ठाकरेन्च्या भाषेत वसुलमन्त्री) नारायन राणे यान्च्या माकडचाळ्यान्च्या रुपाने पाहात आहोत्.सत्तेसाठी हपापलेल्या या नेत्याने आपण काय बोलतो आहोत याचे ही भान ठेवले नाही.आपल्याच पक्षावर विरोधीपक्षनेत्याप्रमाणे हल्ला चढवत नेत्यान्चे दहशतवाद्यान्शी सम्बन्ध असल्याचे जाहीर आरोप केलेत्.आपल्याला जेव्हा मुख्यमन्त्री पदाची खुर्ची मिळत नसल्याचे त्यान्ना दिसले तेव्हा त्यान्नी असे आरोप करायला सुरुवात केली.देशाच्या दॄष्टीने एवढी महत्त्वाची माहिती त्यान्च्याजवळ असताना मन्त्रीमन्डळात असे पर्यन्त ती लपवुन ठेवली याबद्दल पोलिसान्नी त्यान्ना ताब्यात घेऊन त्यान्ची नार्को टेस्ट घेतली पाहिजे.अशा या सत्तापिपासु नारोबाला ना लाज ना लज्जा.
असाच पण अतिशय निर्लज्जपणाचा कळस एका नेत्याने केलां. नेतेमन्डळी किती निर्ढावलेले असतात याचे हे उत्तम उदाहरण. हरियानाचे बडतर्फ उपमुख्यमन्त्री चन्द्रमोहन यान्नी जो प्रताप केला तो केवळ कामातुरा न भय न लज्जा या सदरात मोडनारा आहे.युध्दात आणि प्रेमात सर्व काही माफ असते असे म्हटले जाते. आता राजकारणात आणि प्रेमात सर्व माफ असते असे यान्ना वाटते कि काय असा प्रश्न मला पडतो. या महाशयान्नी उपमुख्यमन्त्र्यासारख्या महत्त्वाच्या पदावर काम करत असताना एका महिला सरकारी वकिलाला आपल्या प्रेमपाशात अडकविले आणि तब्बल दोन महिने सरकारला कोणतीही माहिती न देता फरार झाले. परवाकडेच एका वाहिन्याच्या पत्रकाराने त्यान्ना त्यान्च्या नव्या बिबी सोबत पकडले. त्यान्ची आधी एक बायको होती.आता दुसरया बायकोची द्विभार्याप्रतिबन्धक कायद्यामुळे अडचण नको म्हनुन या महाशयान्नी चक्क आपला धर्मच बदलुन टा़कला .बरे हे महाशय म्हणजे कोणी साधेसुधे राजकारणी नाहीत, तर ते आहेत हरियानाचे माजी मुख्यमन्त्री भजनलाल यान्चे लाडके चिरन्जीव !! भजनलाल यान्नाही पुत्राचे प्रताप पाहुन ` पुत्र व्हावा ऐसा गुन्डा त्याचा तिन्ही लोकी झेन्डा ` असे म्हनन्याची पाळी आली असेल.चन्द्र मोहन यान्नी आता धर्म बदलल्यामुळे चान्द मोहम्मद हे नाव धारण केले आहे.

सत्ता आणि स्वार्थासाठी राजकारणी कोनत्या पातळीला जातिल याचे राणे आणि चन्द्रमोहन हे उत्तम उदाहरण आहे.
टिप :- किबोर्ड च्या अडचणीमळे या लेखात अनुस्वार देता आले नाहीत. त्याबद्द्ल व्याकरणप्रेमी वाचक क्षमा करतील ही अपेक्षा !!

No comments:

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...