Monday, August 10, 2015

अन्नदात्याची लुटमार

          का शेतकरी आत्महत्या करणार नाही हो ? पहा न ही डाळींबची बिल्टी .सत्तर क्रेट डाळिंब मार्केट मध्ये नेल्यानंतर हातात आले तीन रुपये ऐशी पैसे.अरे किती क्रूर चेष्टा ही .या पैशात विषाची बाटलीसुद्धा येणार नाही .मग झाडाला लटकून फाशी घेण्याशिवाय पर्याय तरी आहे का ? उन्हातान्हात राब राब राबून पिक घेतले.भर उन्हाळ्यात tankar ने पाणी आणून पिकांना दिले आणि मार्केट मध्ये आणल्यावर तीन रुपये ऐशी पैसे हातात पडले.घरी परत जायला सुद्धा भाड्याला पैशे नाहीत.व्यापारी मात्र या तीन रुपये ऐशी पैश्याच्या बदल्यात तीन हजार कमवणार आणि गब्बर होणार .माझ्या प्रश्नाचं उत्तर यातच मला मिळाले आहे.मला नेहमी प्रश्न पडायचा शेतकरी आत्महत्या करतो पण व्यापारी आणि पुढारी का कधी आत्महत्या करीत नाही .अशी लुटमार जर होत असेल तर कशे व्यापारी आत्महत्या करतील ? आता वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायची ,एकजूट करायची आणि या व्यवस्थेविरुध्द एल्गार पुकारायाची .अशी वेळ आली पाहिजे कि या शोषण करणाऱ्या व्यापार्यांनी आणि पुढार्यांनी आत्महत्या केल्या पाहिजेत .त्यांना सळो कि पळो करून सोडले पाहिजे

No comments:

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...