Monday, December 1, 2008

गच्छंती दोघा पाटलांची

अखेर देशाचे गृहमंत्री श्री. शिवराज पाटील यांची पदावरुन गच्छंती झाली.तब्बल १८ बॉंम्बस्फोट आणि हजारावर बळी गेल्यानंतर या महोदयांनी नैतीक (??)जबाबदारी स्वीकारत राजिनामा दिला.पदावरुन पायउतार होईपर्यंत ( हाकलले जाईपर्यंत )त्यांनी गृहमंत्री पदाची होईल तेवढी शोभा केली.दिल्ली बॉंम्बस्फोटनंतर अवघ्या काही तासात ३ वेळा आपले कपडे बदलुन त्यांनी आपण किती बेजबाबदार आहोत हे दाखवुन दिले होते.केवळ हायकमांडचा आशीर्वाद असल्यामुळे लातुरला पराभुत झालेला हा तथाकतीत नेता सरळ देशाचा गृहमंत्री झाला.ग्रामीण भागात जसा एखाद्या दगडाला शेंदुर लावला कि लोक त्या दगडाची मनोभावे पुजा करतात,त्याप्रमाणे कॉंग्रेस पक्षात अशा काही दगडांना शेंदुर लावला जातो.मात्र आता मुंबई बॉंम्बस्फोटानंतर कॉंग्रेस पक्षाची गोची झाल्यामुळे त्यांनी या तोंडपाटीलकी करनारया पाटलांना लातुरचा रस्ता दाखवला. `या बॉंम्बस्फोटाचा मी जाहीर निषेध करतो,मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना प्रकट करतो.` हे पाठ केलेले वाक्य आता पाटलांच्या तोंडुन ऐकु येणार नाहीत. आत्ताच आलेल्या बातमीनुसार महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. आर. आर. पाटील यांचीही गछंती झालेली आहे.मी काल लिहिलेल्या स्तंभानुसार आबांनी आत्मपरीक्षन निश्चीतच केलेल असेल.किंवा त्यांना तसे करायला त्याच्या पक्षाने भाग पाडलेले असेल.भरीस भर म्हनुन आबांनी बॉंम्बस्फोटनंतर वादग्रस्त विधान केले.इतने बडे शहर मे ऐशी छुटपुट घटना होती है,असे अतिशय निर्ढावलेले प्रतिक्रीया दिली.तिचा व्हायचा तो परिणाम झाला. या दोघा गृहामंत्र्यांच्या राजीनाम्याने दहशतवादाचा प्रश्न सुटेल असे नाही.मात्र प्रशासनाचे निर्ढावलेपण कमी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

1 comment:

Deepak said...

..... नैतिक जबाबदारी स्विकारुन आणि राजीनामे देऊन मुळ प्रश्न सुटला असे होत नाही...एका पदाचा राजीनामा देऊन उद्या तुम्ही दुस-या पदाचा स्विकार कराल...आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या ..!

खरंच तुमचा - मंत्र्यांचा - अंतरात्मा जागला असेल तर जबाबदारी पुर्णपणे स्विकारा आणि आपल्या राजकिय कारकिर्दीचा राजीनाम द्या!...

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...