Tuesday, December 2, 2008

होय, ते भुंकलेच !!

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या धक्क्यातुन देश सावरत असतांना पुढचे धक्के देन्याचे काम आता सफेद कपडयातील राजकारनी म्हनवनारे दहशतवादी आपल्या वाचाळ्पणातुन देत आहेत.`इतने बडे शहरमे ऐशी छुट्पुट घटना होती है`असे आपल्या राज्याचे माजी ( होय आता माजीच )गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी थोडयाफार का होईना सभ्य भाषेत सांगितले. त्याची त्यांना योग्य ती सजा मिळालीही.परंतु केरळचे मुख्यमंत्री श्री.अच्युतानंद व भाजपा चे वरिष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी जे काही तारे तोडले ते केवळ `भुंकणे` या सदरातच मोडनारे आहे.
हॉटेल ताज मधील कमांडो कारवाई करतांना बंगलोरचा तरणाबांड मेजर संदिप उन्नीकृश्नन शहीद झाला.तो मुळचा केरळ मधील होता.मात्र त्याचे वडील बंगलोरला स्थायीक असल्यामुळे त्याचा अंत्यसंस्कार तेथेच झाला.अंत्यसंस्कारास कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. येदीयुरप्पा आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी व वरीष्ठ अधिकारी उपस्थीत होते.परंतु शहीद संदीप ज्या राज्यातुन आलेला होता त्या केरळ राज्याचे कोणीही प्रतिनिधी हजर नव्हते.याचा संदीपच्या वडीलांना मनोमन राग आलेला होता .वृत्तवाहीन्यांनी याबाबतीत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री श्री.अच्युतानंद यांना उपरती झाली.मात्र त्यांनी संदीपच्या घरी सांत्वनासाठी जान्याअगोदर घराची डॉगस्क्वॉडमार्फत तपासनी करन्याची चुक केली.या प्रकाराने संदीपचे वडील संतप्त झाले.एखाद्या शहीदाच्या घराची डॉगस्क्वॉडमार्फत तपासनी करणे खरेतर त्या शहीदाचा अपमानच होता.त्यामुळे श्री.अच्युतानंद तेथे येताच संदीपच्या वडीलांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.यावर अच्युतानंदांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की संदीप शहीद झाला नसता तर त्याच्या घरी कुत्रेही गेले नसते.ऐका अर्थाने या महाशयांनी स्वताला कुत्र्याची उपमा देऊन घेतली.स्वताची बेईज्जत झाल्यानंतर प्रगल्भ म्हनुन घेनारे राजकारनी असे बेताल होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.मात्र आपण अशा प्रवृत्तीचा निषेधच केला पाहीजे.
असेच बेताल वक्तव्य मुख्तार अब्बास नक्वी या भाजपाच्या राष्ट्रीय (???) नेत्याने केले.केवळ हिंदुत्ववादी पक्षात असल्यामुळे या नेत्याला वकुब नसताना राष्ट्रीय नेता बनवीले गेले.खरेतर हा फिल्मी ढंगातला पटकथाकार माणुस.मात्र फिल्मी स्टाईलने डॉयलॉग बोलन्याच्या मोहापायी त्याने आपली वैचारीक पातळी दाखवुन दिली.मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांना श्रध्दांजली अर्पण करताना काही नागरीकांनी ,महीलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.त्याचा या मुख्तार साहेबांना भलताच राग आला.या महीला लिपस्टीक लावुन आणि तोंडाला पावडर फासुन लोकांना नेत्यांविरोधात भडकावत होत्या ,असा आरोप या महाशयांनी केला .त्यांना या महीलांच्या तोडांची पावडर व लिपस्टीक दिसली पण त्यांच्या डोळ्यातील अश्रु दिसले नाहीत.त्यांच्या वेदना ,भिती ,असुरक्षीतता दिसली नाही.त्या महीला केवळ मुख्तार साहेबांविरुध्द बोलत होत्या असे नाही ,तर त्या समस्त राजकारन्यांवर आपला संताप व्यक्त करत होत्या.मग मुख्तार साहेबांनीच एवढे का मनावर घेतले ??पण आपल्याकडे राजकारन्यांना असे काही वाद ओढवुन प्रसिध्दी मिळवन्याची किंवा मिडीयाच्या केंद्रस्थानी राहान्याची इच्छा पुर्णॅ करता येते.मुख्तार नक्वी यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला.मात्र त्यांच्या या बडबडीमुळे हजारो लाखो भगिनींचा ,त्यांच्या भावनांचा अपमान झाला त्याचे काय ?
म्हनुन या दोघा नेत्यांच्या या बेताल बडबडीचा `भुंकले` या शब्दात वर्णन करतो व त्यांचा जाहीर निषेध करतो.

No comments:

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...