Wednesday, December 10, 2008
कामातुरा न भय न लज्जा
असाच पण अतिशय निर्लज्जपणाचा कळस एका नेत्याने केलां. नेतेमन्डळी किती निर्ढावलेले असतात याचे हे उत्तम उदाहरण. हरियानाचे बडतर्फ उपमुख्यमन्त्री चन्द्रमोहन यान्नी जो प्रताप केला तो केवळ कामातुरा न भय न लज्जा या सदरात मोडनारा आहे.युध्दात आणि प्रेमात सर्व काही माफ असते असे म्हटले जाते. आता राजकारणात आणि प्रेमात सर्व माफ असते असे यान्ना वाटते कि काय असा प्रश्न मला पडतो. या महाशयान्नी उपमुख्यमन्त्र्यासारख्या महत्त्वाच्या पदावर काम करत असताना एका महिला सरकारी वकिलाला आपल्या प्रेमपाशात अडकविले आणि तब्बल दोन महिने सरकारला कोणतीही माहिती न देता फरार झाले. परवाकडेच एका वाहिन्याच्या पत्रकाराने त्यान्ना त्यान्च्या नव्या बिबी सोबत पकडले. त्यान्ची आधी एक बायको होती.आता दुसरया बायकोची द्विभार्याप्रतिबन्धक कायद्यामुळे अडचण नको म्हनुन या महाशयान्नी चक्क आपला धर्मच बदलुन टा़कला .बरे हे महाशय म्हणजे कोणी साधेसुधे राजकारणी नाहीत, तर ते आहेत हरियानाचे माजी मुख्यमन्त्री भजनलाल यान्चे लाडके चिरन्जीव !! भजनलाल यान्नाही पुत्राचे प्रताप पाहुन ` पुत्र व्हावा ऐसा गुन्डा त्याचा तिन्ही लोकी झेन्डा ` असे म्हनन्याची पाळी आली असेल.चन्द्र मोहन यान्नी आता धर्म बदलल्यामुळे चान्द मोहम्मद हे नाव धारण केले आहे.
सत्ता आणि स्वार्थासाठी राजकारणी कोनत्या पातळीला जातिल याचे राणे आणि चन्द्रमोहन हे उत्तम उदाहरण आहे.
टिप :- किबोर्ड च्या अडचणीमळे या लेखात अनुस्वार देता आले नाहीत. त्याबद्द्ल व्याकरणप्रेमी वाचक क्षमा करतील ही अपेक्षा !!
Monday, December 8, 2008
`अरे थु तुझ्या जिंदगीवर `
दिवाळीच्या काही दिवस आधीची घटना आहे.जगभर मंदीची चाहुल लागली होती.भल्या भल्यांची झोप या मंदीच्या चाहुलीमुळे उडाली होती.मी ही हताशपणे माझ्या अशिलांसमवेत शेअर्स मार्केटचे अवलोकन करत बसलो होतो. माझा व्यवसायच शेअर्स ब्रोकिंगचा असल्यामुळे मला सकाळी ९.५५ ते दुपारी ३.३० पर्यंत कोणताही डिंक न वापरता खुर्चीला चिकटुन बसावे लागते. बरोबर तेवढयाच कालावधीसाठी माझ्या कानाचे आणि माझ्या मोबाईलचे प्रेमसंबंध उत्कट स्थितीला पोहोचलेले असतात.परंतु मंदीचा फटक्यामुळे आता त्यांच्यातही दुरावा निर्माण झालेला होता.
म्हनुनच मी त्यादिवशी डोंबारयाच्या ढोलकीचा आवाज ऐकु शकलो.आवाज ऐकताच क्षणी मी खुर्चीतुन उठलो आणि ऑफिसच्या बाहेर आलो.अगदी समोरच डोंबारयाने आपला खेळ चालु केला होता. एव्हाना आमच्या ईमारतीच्या व्हरांडयात बरयापैकी गर्दी जमली होती.दोघाबाजुने दोन दोन टोकरांनी बांधलेल्या दोरीवर एक चिमुरडी तोल सांभाळत कसरत होती.तीची आई आपल्या आणखी दोन बछडयांना सांभाळत त्या चिमुरडीवर ओरडत होती.माझ्या मुलीपेक्षा वर्षा दोन वर्षानी मोठी असणारी ती चिमुरडी अतिशय निर्विकारपणे त्या उंच बांधलेल्या दोरीवर कसरत करत होती.तिच्या मनात कसलीही भिती दिसत नव्हती.तिचा तो निर्विकार चेहरा पाहुन माझ्या डोळ्यात टपकण पाणी आले.
माझ्याबरोबर अनेक जण तिची कसरत पहात होते.शेजारच्या ऑफिसमध्ये आलेले एक सदगृहस्थ आपल्या कडयावरच्या छकुलीला अतिशय आनंदाने ती कसरत दाखवत होते आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचे शुटिंग करत होते.मी डोळ्यातील पाणी पुसत होतो आणि अचानक डोंबार्याची बायको हातात ताट घेऊन पैसे मागायला येताना दिसली. तिला पाहताच आतापर्यंत त्या चिमुरडीच्या कसरतीचा आनंद घेनारे पळायला लागले होते.त्या सर्वांना मी थांबायला लावले आणि प्रत्येकाने १० रुपये देण्याचे भावनीक आवाहन केले.तेथे हजर असलेल्या शिपायापासुन ते मालकापर्यंत सर्वांनी अगदी भरभरुन प्रतिसाद दिला.मात्र आपल्या कडयावरच्या छकुलीला आनंदाने ती कसरत दाखवरया इसमाने( आता मी त्याला सदगृहस्थ म्हननार नाही) माझ्या आवाहनाला भिक घातली नाही.मी त्याला जाणीव करुन दिली कि साहेब तुम्ही त्या पोरिची कसरत दाखवत होतात तेव्हा तुमच्या मुलीच्या चेहर्यावर आनंद ओसंडुन वाहात होता.आणि त्याचेही पैसे देत नसाल तर तुम्ही जी शुटींग केली त्याचे तरी द्या.तेव्हा कुठे त्या इसमाने सुट्टे नाहीत १० रुपये देतो नंतर असे सांगुन शेजारच्या ऑफीसात एंट्री मारली .डोंबार्याचा खेळ संपत आला होता.
साहेब १० रुपये देनार नाहीत यावर व्हरांडयातल्या सर्वांचे एकमत झाले होते.मी १० रुपये सोडनार नाही असे सगळ्यांना सांगितले होते.मीही माझ्या स्वभावाप्रमाणे ईरेला पेटलो होतो.तो इसम शेजारच्या ऑफीसमधुन बाहेर पडल्या पडल्या मी पुन्हा माझा घोशा सुरु केला.मी सुट्टे आणुन देतो थोडयावेळात असे म्हनत तो इसम भरकन निघुन रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या दहा बारा लाखाच्या आलिशान गाडीत जाऊन बसला .आम्ही सारेजन त्याच्याकडे पहात होतो.त्यानेही आमच्याकडे पाहीले आनि गाडी चालु केली .त्याक्षणी माझ्या तोंडतुन जोरदारपणे आवाज निघाला.....`अरे थु तुझ्या जिंदगीवर `
Tuesday, December 2, 2008
होय, ते भुंकलेच !!
हॉटेल ताज मधील कमांडो कारवाई करतांना बंगलोरचा तरणाबांड मेजर संदिप उन्नीकृश्नन शहीद झाला.तो मुळचा केरळ मधील होता.मात्र त्याचे वडील बंगलोरला स्थायीक असल्यामुळे त्याचा अंत्यसंस्कार तेथेच झाला.अंत्यसंस्कारास कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. येदीयुरप्पा आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी व वरीष्ठ अधिकारी उपस्थीत होते.परंतु शहीद संदीप ज्या राज्यातुन आलेला होता त्या केरळ राज्याचे कोणीही प्रतिनिधी हजर नव्हते.याचा संदीपच्या वडीलांना मनोमन राग आलेला होता .वृत्तवाहीन्यांनी याबाबतीत आवाज उठवल्यानंतर मुख्यमंत्री श्री.अच्युतानंद यांना उपरती झाली.मात्र त्यांनी संदीपच्या घरी सांत्वनासाठी जान्याअगोदर घराची डॉगस्क्वॉडमार्फत तपासनी करन्याची चुक केली.या प्रकाराने संदीपचे वडील संतप्त झाले.एखाद्या शहीदाच्या घराची डॉगस्क्वॉडमार्फत तपासनी करणे खरेतर त्या शहीदाचा अपमानच होता.त्यामुळे श्री.अच्युतानंद तेथे येताच संदीपच्या वडीलांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.यावर अच्युतानंदांनी प्रतिक्रीया देताना म्हटले की संदीप शहीद झाला नसता तर त्याच्या घरी कुत्रेही गेले नसते.ऐका अर्थाने या महाशयांनी स्वताला कुत्र्याची उपमा देऊन घेतली.स्वताची बेईज्जत झाल्यानंतर प्रगल्भ म्हनुन घेनारे राजकारनी असे बेताल होतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.मात्र आपण अशा प्रवृत्तीचा निषेधच केला पाहीजे.
असेच बेताल वक्तव्य मुख्तार अब्बास नक्वी या भाजपाच्या राष्ट्रीय (???) नेत्याने केले.केवळ हिंदुत्ववादी पक्षात असल्यामुळे या नेत्याला वकुब नसताना राष्ट्रीय नेता बनवीले गेले.खरेतर हा फिल्मी ढंगातला पटकथाकार माणुस.मात्र फिल्मी स्टाईलने डॉयलॉग बोलन्याच्या मोहापायी त्याने आपली वैचारीक पातळी दाखवुन दिली.मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर शहीदांना श्रध्दांजली अर्पण करताना काही नागरीकांनी ,महीलांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.त्याचा या मुख्तार साहेबांना भलताच राग आला.या महीला लिपस्टीक लावुन आणि तोंडाला पावडर फासुन लोकांना नेत्यांविरोधात भडकावत होत्या ,असा आरोप या महाशयांनी केला .त्यांना या महीलांच्या तोडांची पावडर व लिपस्टीक दिसली पण त्यांच्या डोळ्यातील अश्रु दिसले नाहीत.त्यांच्या वेदना ,भिती ,असुरक्षीतता दिसली नाही.त्या महीला केवळ मुख्तार साहेबांविरुध्द बोलत होत्या असे नाही ,तर त्या समस्त राजकारन्यांवर आपला संताप व्यक्त करत होत्या.मग मुख्तार साहेबांनीच एवढे का मनावर घेतले ??पण आपल्याकडे राजकारन्यांना असे काही वाद ओढवुन प्रसिध्दी मिळवन्याची किंवा मिडीयाच्या केंद्रस्थानी राहान्याची इच्छा पुर्णॅ करता येते.मुख्तार नक्वी यांचा हा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला.मात्र त्यांच्या या बडबडीमुळे हजारो लाखो भगिनींचा ,त्यांच्या भावनांचा अपमान झाला त्याचे काय ?
म्हनुन या दोघा नेत्यांच्या या बेताल बडबडीचा `भुंकले` या शब्दात वर्णन करतो व त्यांचा जाहीर निषेध करतो.
Monday, December 1, 2008
गच्छंती दोघा पाटलांची
कथा न झालेल्या जुलाबाची
नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...
-
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 💪🌹 *यशोगाथांचे पंचक* 🌹💪 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ समाजबांधवांनो, जय शिवराय 🙏🚩 *मराठा शुभ लग्न डॉट कॉम* www.marathashubhlagna....
-
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *मराठा शुभ लग्न व्हाट्सअप बुलेटिन* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* *जय शिवराय* 🙏🚩 *------------------------------* ...
-
समाजबांधवांनो जय शिवराय गेल्या १३ वर्षांपासून मराठा समाजातील वधूवरांचे लग्न जमवताना हजारो पालकांशी संबंध आला.अनेक भलेबुरे अनुभव आलेत.ते म...