Friday, February 20, 2009

लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने काही ...

साधारण या वर्षीच्या एप्रिल मे महीन्यात संपुर्ण भारत लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जानार आहे.अशावेळी माझ्या मनात प्रश्न निर्माण होतो कि स्वातंत्र्यानंतर जवळपास ६० वर्षाहुन अधिक काळ लोटल्यानंतरही आपण खरेच स्वतंत्र आहोत का ?? १९४७ पुर्वी आपल्यावर ब्रिटीशांची जुलमी राजवट होती आणि त्यानंतर आपल्यावर भ्रष्ट्राचारी,लबाड,कलंकीत,गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारन्यांनी राज्य केले.त्यांनी केवळ राज्यच केले असे नाही तर बहुमताच्या नावाखाली लोकशाहीची क्रुर अवहेलना केली.मनमोहन सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव ,शिबु सोरेन यांचे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतरही झारखंडचे मुख्यमंत्रीपद न सोडणे ही त्याची ताजी उदाहरणे आहेत.अशा नेत्यांमुळे भारत कधीही एक सशक्त राष्ट्र म्हणुन विकसीत होउ शकला नाही.त्यामुळ स्वातंत्र्यप्राप्तीच्यावेळी पाहीलेल्या स्वप्नांचा आज पार चुराडा झाला आहे.
हे असे का झाले ? याचा जर विचार केला तर मी काही प्रमाणात दोष जनता जनार्दनालाच देईन.केवळ आंधळेपनाने एखाद्या पक्षाचा अनुनय करुन जनता कोनत्याही ऐर्या गैर्या उमेदवाराला निवडुन देत आली आहे.मात्र आता हे कुठेतरी थांबायला हवे आहे.त्यासाठी सुज्ञ मतदारांनीच आता पुढाकार घेतला पाहीजे.पुढार्यांना आता जाणीव करुन देन्याची वेळ आली की ते आता लोकांना अधिक काळ वेडयात काढु शकत नाही.खाली दिलेल्या माझ्या काही कल्पना जर सगळयानी अमलात आणल्या तर देशाचे थोडेशे तरी ऋण फेडल्याचे आपल्याला समाधान मिळेल.
१)भारताच्या सर्व नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावलाच पाहीजे.
2)वयाची ७० वर्ष पुर्ण केलेल्या कोनत्याही उमेदवारास मतदान करु नये मग तो नेता कितीही मोठा असला तरीही.
3)गुन्हेगारी प्रवृतीच्या,भ्रष्ट्राचारी अशा उमेदवारास मतदान करु नये.
४) जातीय प्रवृतीच्या उमेदवारास मतदान करु नये.
५)अनेक लोक फक्त सरकारच्या निष्काळजीपणाबद्दल,अकार्यक्षमतेबद्दल गळा काढत असतात,पण मतदानास जात नाहीत. अशा लोकांना बळजबरीने मतदानास प्रवृत्त करावे.
६)अकार्यक्षम उमेदवार,जो संसदेत जाऊन फक्त झोपा काढणार असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.
७)विधानसभेत किंवा संसदेत जाऊन फक्त धुडगुस घालन्यात ज्यांना मुर्दुमकी वाटत असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.
८)वेळोवेळी पक्ष बदलुन स्वतःचे स्वार्थ साधत असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.
९)दहशतवादी,नक्षलवादी किंवा इतर देशविघातक शक्तींशी संबंध असेल अशा उमेदवारास मतदान करु नये.
आणि सगळ्यात महत्वाचे
१०)सुशिक्षीत ,जो कमीत कमी १० वी पास असेल अशाच उमेदवारास मत द्यावे.

कथा न झालेल्या जुलाबाची

 नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद विद्यानिकेतन शाळेच्या स्थापनेला यंदा ५० वर्ष (सुवर्णमहोत्सव) पूर्ण होत असून त्यानिमित्त माजी विद...