काल एका वृत्तपत्रामध्ये ज्यांनी भ्रष्ट्राचारांविरुद्ध कारवाई करायची
असते त्या लाचलुचपत खात्यातीलच भ्रष्ट्राचारांविरुद्ध व्यंगचित्र छापुन आले
होते .ते पाहिल्यावर मला माझा अनुभव आठवला.माझ्या भाऊबंदकीतल्या एका
शेतकरी आपल्या सातबारा नोंदी लावन्यासाठी तलाठी कार्यालयात चकरा मारत
होता.तलाठी नोंदी लावण्यास तयार होता मात्र त्यासाठी पैसे मागत होता
.शेतकरी जेव्हा कार्यालयात जात तेव्हा तलाठी आपल्या खास शैलीत एक संवाद
म्हनायचा ,` ज्याच्या खिशाला भोक त्याचे काम चोख !!!.या प्रकाराला वैतागुन
शेवटीने माझ्या भाउबंदाने सगळा प्रकार मला सांगितला व मी मध्यस्थी करावी
अशी विनंती केली.तलाठी लांबच्या नात्यागोत्यातला होता म्हनुन काम होऊन जाईल
अशी मला आशा होती म्हनुन मी विनंती मान्य केली व तलाठ्याकडे गेलो
.माझ्यापुढेही तेच तुनतुने वाजविले ,ज्याच्या खिशाला भोक त्याचे काम चोख
.शेवटी आम्ही लाचलुचपत प्रतीबंधक खात्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेलो.तेथे
आम्हाला सर्व कार्यपध्द्ती समजावुन सांगण्यात आली व तलाठ्याच्या भेटीची
तारिख ,स्थळ ,वेळ ठरवुन पुन्हा येण्यास सांगण्यात आले.सदर शेतकरी त्या
दिवशी माझ्याकडेच नाशिकला मुक्कामला होता आणि अशी तक्रार करायची आहे हे
त्याला आणि मलाच माहिती होते.तशी गुप्तता आम्ही पाळली होती.दुसर्या दिवशी
जेव्हा शेतकरी नाशिक हुन गावाला घरी गेला तेव्हा तलाठी त्याच्या आधी दप्तर
घेऊन हजर होता.तेव्हा मात्र तो नात्यागोत्याचा संदर्भ देत होता आणि पाहिजे
ती कागदपत्रे द्यायला तयार झाला होता.मलाही खुप आश्चर्य वाटले .असे एकाएक
खिशाचे भोक कसे शिवले गेले ?? काही दिवसांनी त्याला खुप विश्वासात घेतले
तेव्हा कळले की लाचलुचपत प्रतीबंधक खात्यानेच तलाठ्याच्या खिशाला भोक
पाडले होते !!!!!
No comments:
Post a Comment