बाप्पा ,तुला काल मोठया आनंदाने आणि उत्साहाने निरोप दिला खरा ,पण आज भलतेच कंटाळवाणे वाटते आहे रे .घर नुसते रिकामे रिकामे वाटते आहे. काल तू म्हटलास खरा पुढच्या वर्षी लवकर येईन म्हणून ,पण वर्षभर वाट पाहणे म्हणजे आमची परीक्षाच आहे रे बाबा .मी तर आत्ताच `काउंट डाउन`सुरु केले आहे .
एक मात्र बर झाल.तुझ्यामुळे दहा दिवस भरपेट मोदक खाऊन शरीरातला गोडवा आणखी वाढवता आला.सारखं सारखं डायबेटीसची भीती दाखवणाऱ्या बायकोला चोरून मोदक खाण्याची मजा काही औरच होती.आता थेट पुढच्याच वर्षी मोदक खायला मिळणार म्हणून मन जरा खट्टू होत रे .
बाप्पा दहा दिवस कसे गेले काही कळलेच नाही.सकाळी सकाळी तुझ्या आरतीसाठी धावपळ उडायची .कुणी दुर्वा आणायला पळायचं तर कुणी फुलं .सगळं वातावरण कस मंगलमय असायचं.तुला सुखकर्ता दुखहर्ता का म्हणतात हे या दहा दिवसात कळले बर का .तू आल्यापासून जाईपर्यंत बायको चक्क शब्दानेसुद्धा भांडली नाही .`पप्पा ,तुम्हाला काही कळत नाही हो `हे वाक्य दहा दिवसात कानावर आलं नाही .घरात असे गुण्यागोविन्दाचे वातावरण असताना बाहेरसुद्धा शान्तता आणि सुव्यवस्था नांदत होती .तुझे सगळ्यात जास्त कोणी आभार मानत असेल तर ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर.आबा हेच .लालबागच्या राजाचे दोनचार प्रसंग वगळता सगळीकडे आलबेल होत .मिडीयाला चघळायला काहीतरी खाद्य हवे म्हणून लालबागचे प्रकरण तूच घडविले अशी भाविकात चर्चा होती .
बाप्पा ,ते आसारामबापूवाले मदतीला आला नाहीस म्हणून तुला शिव्या देत होते बर का .माझे नाव नको सांगूस ,पण काही लोक तुझ्या नावाने डबल मोदक वाटत होते बर का .म्हणे तू दाभोलकरांना संपविले .भलतंच काहीतरी .पण तू भलताच भारी बर का ,तुझ्या त्या लाडक्या भक्ताला ,जयवंत साळगावकरांना बरोबर प्रोमोशन देऊन तुझ्या दरबारात हजर करून घेतले .
बाप्पा ,तुझ्या अशाच करामती चालू ठेव आणि पुढच्या वर्षी लवकर ये रे बाबा.आणि येण्याच्या आधी यंदा जसा भरपूर पाऊस पाडला तसा जोरदार बरसू दे मगच ये .ते पेट्रोल ,डीझेलच तेवढे पहा .जरा भाव कमी करता आलेत तर आवडेल आम्हाला .महागाई ,भ्रष्ट्राचार ,बेरोजगारी यांच्याकडे दुर्लक्ष करू नकोस .
बाप्पा ,तू त्या उंदीर मामाला ,सॉरी बाप्पा ,तुझ्या त्या मूषक`राज`ला रागावत का नाहीस रे .तुला माहित नसेल कदाचित त्याने आमच्या नाशिकच्या विकासाची `ब्ल्यू प्रिंट `लपवून ठेवली आहे .त्याने ती कुरतडण्याच्या आत पुढच्या वर्षी घेऊन ये रे बाप्पा .नाहीतर `पब्लिक `कोणाला कुरतडेल हे तुला सांगायला नको .
बाप्पा ,एक विचारायचंच राहील .तुझ्या दरबारात एखादा चांगला मास्तर आहे का रे .अरे त्या राहुल बाळाला गरिबीची व्याख्या शिकवायची आहे रे.पहा ,असेल तर दे पाठवून त्याला.आणि पुढच्या वर्षी येण्या आधी एक काम जरूर कर.काही अवघड नाही रे तुला .त्या मुक्या मनमोहनला दे ना एक धक्का.पार वाट लावली रे त्याने देशाची.बरोबर आहे तुझ ,तो त्याच्या कर्मानेच जाईल ,पण आमचा एक शिक्का आणि तुझा धक्का उरलेलं काम सोप करेल .नरेंद्र मोदींनी गुडघ्याला बाशिंग बांधून ठेवले आहेच .दे ना एक संधी त्यांना .भला माणूस वाटतो .पाहू या गुजरातची विकासगंगा देशभर पोहचवतात का ते .संधी तर देऊन पहा ,पुढचे पाहू पुढे ,वाजपेयी बनतात कि येडीयुरप्पा !!
बाप्पा ,अजून भरपूर काही सांगण्यासारखे आहे .पण तुलाही किती संकटात टाकाव .आता एवढेच पुरे.पुढच्या वर्षी लवकर ये .आणि ते मोदींचे तेवढे लक्षात ठेव .

No comments:
Post a Comment