अभिनेता अक्षयकुमारने काल बेदम मार खाल्ला.`फिट है ना बॉस `म्हणत हिरोगिरी करणारा अक्षय आज कान धरून उठाबशा काढत होता.त्याचे असे झाले ,काल आमच्या आर्या दीदीच्या शाळेत पालक मेळावा होता.सगळे पालक आपापले चपला बूट वर्गाबाहेर काढून वर्गशिक्षकांशी हितगुज करत होते.एवढ्यात आर्याला कसलीतरी चाहूल लागली.पाहते तर काय ,अक्षयकुमार हवेत गिरक्या घेत स्कूल बसच्या टपावरून उडया मारत डायरेक्ट दुसर्या मजल्यावरच्या आर्याच्या वर्गाबाहेर ! आर्या थोडावेळ पाहतच होती हा काय करतो ते.त्या भामट्या अक्षयने अंगातला `फिट है ना बॉस `चा बनियन काढला त्याची झोळी केली आणि भरल्या ना पटापट चपला बूट त्या झोळीत !सगळ्या पालकांमध्ये एकदम घाबरगुंडी उडाली .कोणीच काही बोलेना. मग आर्यादिदीच पुढे आली आणि घेतली ना गिरकी हवेत.दाणकन लाथ अक्षयच्या छाताडावर .अक्षय गपगार .मग काढल्या उठाबशा .
पहाटे शाळेत सोडायला जाताना आर्याने रात्री पडलेले स्वप्न सांगितले आणि वरून मला विचारले `फिट है ना बॉस `.
पहाटे शाळेत सोडायला जाताना आर्याने रात्री पडलेले स्वप्न सांगितले आणि वरून मला विचारले `फिट है ना बॉस `.
No comments:
Post a Comment