नरेंद्र दाभोळकरांची हत्या होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला.तपास चालू असून तो कुठल्याही निर्णायक स्थितीत पोहोचला नाही.आतापर्यंत शेकडो संशयितांची चौकशी झाली परंतु पोलिसांच्या हातात काहीच आले नाही .एखादा गुन्हा घडला की संशयितांचे रेखाचित्र तयार करून तपास केला जातो.दाभोळकरांच्या घटनेनंतर सुद्धा हे सोपस्कार पार पाडण्यात आले .हल्लेखोर दोन होते म्हणून दोन रेखाचित्रे तयार करून प्रसिद्धीस दिले गेले .मात्र काल पुन्हा सात आठ नवीन रेखाचित्रे तयार केली गेली.मुळात हल्लेखोर दोघेच होते मग रेखाचित्रे जास्त कशी ? सगळीच परिस्थिती गोंधळाची ! पोलिसांच्याच भाषेत सांगायचे तर हा निव्वळ हवेत गोळीबार करण्यासारखा प्रकार आहे.
मुळात अशी रेखाचित्रे काढणे हाच हास्यास्पद प्रकार आहे .कोणीतरी प्रत्यक्षदर्शिने भेदरलेल्या परिस्थितीत काहीतरी अर्धवट सांगितलेल्या माहितीच्या आधारे रेखाचित्रे काढली जातात.आणि तोच धागा पकडून तपास भरकटत जातो आणि खरे आरोपी मजा मारत फिरतात.दाभोळकरांची केस ही `मोस्ट सेन्सिटीव `आहे नाहीतर पोलिसांनी अशा रेखाचित्रांच्या आधारे कोणतेतरी दोन संशयित पकडून काम पुढे चालू ठेवले असते .अगदीच गावरान भाषेत सांगायचे म्हणजे `करून गेला दाढीवाला ,पकडून आणला मिशीवाला `या नेहमीच्याच पोलिसांच्या प्रचलित पद्धतीचा अवलंब केला गेला असता.वरून गुन्ह्याचा तपास लागला म्हणून स्वतःची पाठ थोपडून घेतली असती .असो .
तपास मात्र चालू आहे .आपल्या नेहमीच्या `वाट पाहण्याच्या `वृत्तीने महिनोन्महिने या तपासावर लक्ष ठेवू या .तोपर्यंत ही सात आठ संशयितांची रेखाचित्रे सुद्धा एकमेकांकडे संशयाने पाहू लागतील आणि गुन्ह्याची उकल आपोआप होईल.

1 comment:
लेख उशिरा पहिला . छान , मोजक्या शब्दात कान टोचले आहेत . असेच लिहित रहावे मनःपुर्वक शुभेच्छा !
Post a Comment