आरक्षणाचा फायदा घेऊन आर्थिक स्तर
उंचावण्याबरोबरच वैचारिक पातळीही उंचावली पाहिजे अशा आशयाची प्रतिक्रिया मी
मागच्याच आठवड्यात माझ्या एका फेसबुक पोस्टवर दिली होती .दुर्दैव म्हणा
किंवा आरक्षणाच्या उद्देशाचे अपयश म्हणा अजूनही अनेकांची वैचारिक पातळी
जशी आहे तशीच आहे. असे मत व्यक्त करायला आणि त्याचा अनुभव लगेच घ्यायची वेळ
मला मागच्या आठवड्यात आली .त्याचे असे झाले, शनिवारी मी पुण्याला
जाण्यासाठी ठक्कर बाजार बस स्टॅण्डवर एका बस मध्ये चढलो. बसमध्ये गेलो आणि
आवाज आला ,`ओ हेमंतराव ,या मागे .`बसमध्ये मागच्या बाकावर बसलेल्या एका
ओळखीच्या प्राध्यापकाने आवाज दिला होता.आरक्षणाचा फायदा घेऊन नाशिकमधल्या
एका नामांकित संस्थेत हे प्राध्यापक नोकरीस होते.मी एम.एस्सी .ला असताना सर
सटाणा येथे नोकरीस होते .त्यामुळे त्यांची आणि माझी चांगली ओळख होती .मी
सरांना म्हटले ,इतक्या मागे बसण्यापेक्षा पुढेच या .पण त्यांच्या
आग्रहामुळे मला मागे जावे लागले.पुण्याला जाताना अनेकदा जिल्ह्यातील बरेच
प्राध्यापक सोबत असतात .विद्यापीठातील कामासाठी ते जात असतात .म्हणून
सरांना विचारले ,`काय विद्यापीठात चालले वाटत ?`.
सर ,`नाही रे बाबा ,लगेच उतरायचे आहे स्टेशनवर .कॉलेजला निघालो .
मी ,`बदली झाली की काय सर ?
सरांनी होकारार्थी मान हलवली आणि रेल्वे महामार्गावरच्या एका शहरात बदली झाल्याचे सांगितले .मी थोडी हळहळ व्यक्त करून सटाणाच बरे होते तुम्हाला अप डाऊन करायला अशी समजूत काढायचा प्रयत्न केला . सरांनी स्मितहास्य करत सांगितले ,आरे बरे झाले इकडे माझे महिन्याला तीन चार हजार रुपये वाचतात . मी सहज विचारले कसे काय हो सर ? सरांनी अतिशय सोप्या पद्धतीने त्यांच्या बचतीचे गणित समजून सांगितले .
सरांनी सांगितले, हे पहा हेमंत .मी आता या गाडीने नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत येईन .याचे काय मी तिकीट काढणार आहे का ?
मी विचारले ,`कंडक्टर आला तर ?`
अरे तो आपल्याजवळ येईपर्यंत स्टेशन येऊन लागते .आपण उतरून जायचे .
मी `सर ,बस मध्ये तर गर्दी काहीच नाही .कंडक्टर तर लगेचच येईल .
सर ,`मग अशावेळेस मी सांगतो ,स्टेशनवर माझा मित्र येणार आहे .त्याचे आणि माझे तिकीट बरोबरच काढतो .आणि स्टेशनवर त्याला पाहायच्या निमित्ताने हळूच उतरून जायचे .`
मला मात्र सरांची कीव यायला लागली होती .
मी म्हटले ,`सर इनमीन दहा पंधरा रुपयांकरता एवढा आटापिटा .`
सर,`अरे पुढचे रेल्वेचेही पैसे वाचतात ना बाबा .रेल्वेचे तिकीट काढायला माझ्या डोक्यात का पाणी झाले का ? `
असे म्हणत सरांनी एक खास स्टाईल मध्ये गडगडाटी हास्य केले आणि टाळीसाठी एक हात माझ्यापुढे केला .मी सुन्न झालो होतो .टाळीसाठी मीसुद्धा हात पुढे केला पण तोपर्यंत नाशिकरोड स्टेशन आले होते आणि सर बसमधून उतरायला लागले होते .मी टाळीसाठी पुढे केलेला हात तसाच कपाळावर मारून घेतला.
आरक्षणाच्या बळावर गलेलठ्ठ पगार घेऊनसुद्धा मानसिकता अशीच गलिच्छ राहत असेल तर हे आरक्षणाचे ढळढळीत अपयशच म्हणावे लागेल . (अर्थात याला काही सन्माननिय अपवाद आहेत .)
तरीसुद्धा आपण म्हणूया ,मेरा देश बदल रहा है !!

2 comments:
Very true.........
Very True...........
Post a Comment