लोकांचं काही खरं नाही राव ,काय बोलतील आणि कसे बोलतील काही भरवसा नाही.काल चौकातून घराकडे पायी पायी येत होतो आणि अचानक एक मोटारसायकल जवळ येऊन थांबली .एक जुना मित्र भेटला ,त्याला मी `तमासगिर `च म्हणतो .बोलताना नेहमी वेडेवाकडे हावभाव करून फाटलेल्या तोंडाने बोलत असतो.काल बोलता बोलता म्हटला ,अरे चल निघतो जरा घाई आहे.
विचारलं ,अरे काय घाई एवढी.तर तो .........अरे त्या मुक्याचे पैसे द्यायचे आहेत .
विचारलं ,अरे काय घाई एवढी.तर तो .........अरे त्या मुक्याचे पैसे द्यायचे आहेत .
कोण मुक्या रे ?
अरे ते धिऱ्याच पोरग .
थोडीसी टयूब लुकलुकली .मग समजलं ,अरे हा मुकेश अंबानी च्या कुठल्यातरी सेवेचं बिल भरायला चालला होता .
अशीच एक गम्मत सांगतो . ग्रामीण भागात डॉक्टर च्या बायकोला डॉक्टरीण म्हटले जाते.मास्तरच्या बायकोला मास्तरीण म्हटले जाते.अगदी नेहमीचे आहे हे.पण एकेदिवशी ओळखीच्या एक बाई भेटल्या .बोलता बोलता माझ्या सौ.ची त्यांनी चौकशी केली .`पगारीन` बाईंचे काय चालले ? मला क्षणभर चक्रावल्यासारखे झाले.मग लक्षात आले .पगार ची बायको पगारीन !!!
No comments:
Post a Comment